Tuesday, May 26, 2020

Can you say something about this flower ?


प्रा शरच्चन्द्र श्रीखंडे: विनम्र अभिवादन... 

आपणास माहित असेलच कि , थोर आंतरराष्ट्रीय  संख्याशास्त्रज्ञ प्रा  सी आर राव यांचा  १०सप्टेंबर २०२० रोजी १०० वा वाढदिवस साजरा होतोय . हे वर्ष जगभर प्रा राव यांचे Birth Centenary Year म्हणून साजरे केले जात आहे . एका कार्यक्रमात असेही ऐकायला मिळाले कि आज रोजी प्रा राव हे एकमेव १०० वर्षात पदार्पण केलेले हयात संख्याशास्त्रज्ञ आहेत. प्रा राव यांचे कार्य महान आहे. मार्च महिन्यात मला प्रा राव यांच्यावर विशेष व्याख्यान द्यावयास कर्नाटक विद्यापीठामध्ये निमंत्रित केले होते .  त्यांच्यावर निश्चितच लिहिणे आवश्यक आहे. 
पण आजच्या posting साठी तो विषय नाही. 

आज प्रा शरच्चन्द्र श्रीखंडे यांच्यासाठी post करावं अशी इच्छा झाली

प्रा शरच्चन्द्र श्रीखंडे यांना १०३ वर्षाचे प्रदीर्घ असे आयुष्य लाभले.  मागील महिन्यात २१ एप्रिल रोजी त्यांचं निधन झाले. श्री किरण बर्वे यांनी प्रा शरच्चन्द्र श्रीखंडे यांच्या कार्याचा आढावा १७ मे २०२० च्या सकाळच्या सप्तरंग मध्ये घेतलेला आहे.  खाली link दिलेली आहे. 

https://www.esakal.com/saptarang/saptarang-kiran-barve-write-prof-sharadchandra-lokhande-article-293992

प्रा शरच्चन्द्र श्रीखंडे यांना व त्यांच्या कार्याला  विनम्र अभिवादन !!!


Tuesday, July 30, 2013